दिलासादायक : जिल्ह्यात बाधीतांपेक्षा बरे होणारे वाढले ; सक्रीय रुग्णही घटले

 

 

जळगाव, प्रतिनिधी  । जिल्ह्यात आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या २३० ने जास्त दिसून आली. आणखी महत्वाचे म्हणजे दाखल झालेल्या सक्रीय  रूग्णांची संख्याही  २०२  ने घटल्यामुळे आरोग्य यंत्रणेने घेतलेली मेहनत फळाला येतांना दिसते आहे.

जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या अहवालात आज दिवसभरात १ हजार ३४ रूग्ण बाधित आढळून आले आहे तर १ हजार २०४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जामनेर, रावेर  तालुक्यासह जळगाव शहरात संसर्ग वाढलेले दिसून येत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील आजची आकडेवारी

जळगाव शहर-१७५, जळगाव ग्रामीण-४७, भुसावळ ८६, अमळनेर-६७, चोपडा-५८, पाचोरा-५३, भडगाव-१०, धरणगाव-४२, यावल-६७, एरंडोल-५४ , जामनेर-१११ , रावेर-९६, पारोळा-२४, चाळीसगाव-४९, मुक्ताईनगर-१८, बोदवड-७० आणि इतर जिल्ह्यातील ७  असे एकुण १ हजार ३४  बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अहवालात जिल्ह्यात एकुण १ लाख १३ हजार ७०४  बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख  ७५८  रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर १०  हजार ९३०  बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज अहवालात लक्षणिय बाब म्हणजे दिवसभरात एकुण १८  बाधितांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे. 

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.