कोविडमुळे एमपीएससीची परिक्षा काही दिवस पुढे ढकलली-मुख्यमंत्री

मुंबई प्रतिनिधी । कोविडच्या आपत्तीमुळे एमपीएससीची राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून लवकरच ही परीक्षा घेण्यात येणार असल्याची महत्वाची घोषणा आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली. ते फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतांना बोलत होते.

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज रात्री फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यात ते म्हणाले की, एमपीएससीची परीक्षा ही फक्त काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबत परिक्षेची नवीन तारीख ही उद्या जाहीर करण्यात येणार आहे.

एमपीएससी परिक्षेवरून विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी याला बळी पडता कामा नये. तसेच राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता, पुन्हा लॉकडाऊन लावण्याची शक्यताही असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

Protected Content