रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टतर्फे तरसोद येथे मोफत आरोग्य तपासणी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर तालुक्यातील तरसोद येथे रविवारी गणपति मंदिर परिसरात  घेण्यात आले. शिबिरात सुमारे 210 नागरिकांची तपासणी करण्यात आली. तसेच, विविध आजारांविषयी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.

 

रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टतर्फे तरसोद येथे नुकतेच मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिराचा शुभारंभ रोटरी च्या होणार्‍या नियोजित प्रांतपाल रो. आशा वेणुगोपाल यांच्या हस्ते पार पडला. यावेळी नागरिकांची दंतरोग, डोळ्यांची, त्वचा रोग, श्वसन रोग, स्त्रीरोग, बालरोग, हाडांची तपासणी, मुख व कर्करोग, होमिओपॅथी अशी सर्व तपासणी करण्यात आली. शिबिरात डॉ. जगमोहन छाबरा, डॉ. कल्पेश गांधी,डॉ.राहुल भन्साळी, डॉ. पंकज शाह, डॉ.अमेय कोतकर, डॉ. प्रशांत चोपडा, डॉ.अमित पवार, डॉ. मयुरी पवार, डॉ. चंचल शाह, डॉ. मनोज चौधरी, डॉ. गौरव बाफना, या डॉक्टरांनी नागरिकांची तपासणी केली.

 

प्रसंगी खाद्यपदार्थ खाताना हात स्वच्छ धुणे, फळे धुवून खाणे, व्यायामाला महत्व देणे, साथीच्या आजारांमुळे पाणी उकळून पिणे, गुटखा-तंबाखू-बिडी सोडून द्यावे अशा टिप्स वैद्यकीय पथकाकडून नागरिकांना देण्यात आल्या. प्रसंगी रोटरी क्लब जळगाव ईस्टचे अध्यक्ष संग्रामसिंह सूर्यवंशी,  आरोग्य समिती प्रमुख डॉ. राहुल भन्साळी, प्रकल्प प्रमुख नितेश जैन, संजय गांधी, संजय शाह, अभय कांकरिया, सुनील बैद, प्रणव मेहता, प्रदीप कोठारी, राजेश मुनोत, पूजा अग्रवाल, रोशनी अग्रवाल, पूनम वर्मा,  बिना पवार, हेमंत छाजेड,  मितेश शाह,मयूर मोमाया, सुशील असोपा, विजय कुकरेजा, मधुकर चौबे, हर्षद इंगळे, वर्धमान भंडारी,  सुनील शाह, यांनी शिबीर यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Protected Content