‘निलम’ पाठोपाठ हॉटेल ‘पांचाली’चा परमिटरूमचाही परवाना कायमस्वरूपी रद्द

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील मु.जे. महाविद्यालय रस्त्यावरील प्रभात चौकातील हॉटेल पांचाली या परमिटरूमचा परवाना जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी कायमस्वरूपी रद्द केला आहे, अशी माहिती राज्य उत्पदन शुल्क विभागाचे अधिकारी श्री. दहीवडे यांनी ‘लाईव्ह ट्रेन्डस न्यूज’शी बोलतांना दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षकांना हॉटेल पांचाली मधील मद्यसाठ्याची २८ एप्रिल रोजी बारकाईने तपासणी केली होती. त्यावेळी परवानाधारक माजी नगरसेविका भारती जाधव व त्यांचे पती अजय राम जाधव हे उपस्थित होते. नोंदणीपेक्षा प्रत्यक्ष साठा कमी आढळून आला. तसेच नोंद नसलेला साठाही होता. या तपासणीच्या आधी २६ एप्रीलला हॉटेलचे व्यवस्थापक हर्षल बारी याला पोलीसांनी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करतांना ताब्यात घेतले होते. दरम्यान, जळगाव शहरातील चित्रा टॉकीज चौकात असलेले निलम वाईन्स हाऊसचा परवाना जिल्हाधिकारी यांनी गेल्या आठवड्यात कायमस्वरूपी रद्द केला होता. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती. माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली होती.

आज १५ मे रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी श्री.दहिवडे, निरीक्षक व सहकाऱ्यांनी हॉटेल पांचाली येथे जावून परवाना रद्द केला आहे. उद्या याबाबत अधिक कारवाई होणार असल्याचे श्री. दहिवडे यांनी सांगितले.

Protected Content