कमी किंमतीत शेती मिळण्याचा नादात ११ लाखांची फसवणूक

जळगाव प्रतिनिधी । शेतजमिनीवर मॅनेजर मामलेदाराचे नाव असून ते कमी करुन ती शेतजमीन स्वतात मिळवून देतो असे सांगत वेळोवेळी पैशांची मागणी करीत एकाची ११ लाखात फसवणुक केल्याची घटना उघडकीस आली.

विनायक भालचंद्र ठाकूर रा. एरंडोल आणि पांडूरंग दंगा पाटील रा.  गिरणा कॉलनी चोपडा असे फसवणूक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील जळू शिवारातील शेतजमिन गट नं २४६ यावर तालुक्यातील मॅनेजर मामलेदार यांचे नाव होते. या मिळकतीबाबत पाडुरंग दगा पाटील यांनी मॅनेजर मामलेदार यांचे नाव कमी करुन ती जमिन स्वस्तात खरेदी करु देतो असे रमेश काळू चौधरी रा. नित्यानंद नगर, गिरणा टाकी जळगाव यांना सांगितले. याबाबत २४ नोव्हेंबर २०११ मध्ये बेनापावती करीत सौदापावती व करारनामा करुन दिला होता. या शेतजमिनीचा सौदा हा ११ लाख रुपयात झाला होता तर त्यावर जमिनीचे मूळ मालक पाडूरंग दगा पाटील यांनी संमती म्हणून सही देखील केली होती. या व्यवहारापोटी रमेश चौधरी यांनी पांडूरंग पाटील यांच्या सांगण्यावरुन विनायक भालचंद्र ठाकूर यांना बयाणा म्हणून २ लाखाचा चेक तर १ लाख रुपये रोख दिले होते. तसेच उर्वरीत रक्कम ही खरेदी खतावेळी देण्याचे ठरले होते. त्यानंतर वेगवेगळे कारण सांगून दोघांनी रमेश चौधरी यांच्याकडून २६ जानेवारी २०१२ रोजी २ लाख, १७ डिसेंबर २०१२ रोजी २ लाख आणि २७ जून २०१३ रोजी ४ लाख असे एकुणन ११ लाख रूपये घेतले.

बेचेन पावती करारनाम्यानूसार ११ लाख रुपये त्यांना मिळाले असल्याचे त्यांनी केलेल्या बेचेन पावतीमध्ये नमूद केले आहे. तसेच सातबार्‍यावर नाव लागल्यानंतर लागलीच खरेदीखत लिहून व नोंदवून देण्यास बांधित असल्याचे त्यांनी २७ जून २०१३ करुन दिलेल्या भरणापावतीमध्ये त्यांनी कबुल केले आहे. 

या शेतजमिनीवर पांडुरंग पाटील यांनी उपविभागीय अधिकारी एरंडोल यांच्या कार्यालयात जावून त्या मिळकतीवर असलेले मामलेदार मॅनेजरचे नाव कमी करून त्यावर मूळ मालक म्हणून नाव लावण्यासाठी १९ ऑगस्ट २०१९ रोजी अर्ज केला होता. उपविभागीय अधिकार्‍यांनी त्यावरील मामलेदारचे नाव कमी करुन मिळकतीच्या सातबार्‍यानुसार मूळ मालक पांडूरंग दगा पाटील यांचे नाव लावण्याचे आदेश दिले. त्यानुसान पांडूरंग पाटील यांचे त्या शेतजमिनीच्या उतार्‍यावर नाव लागले होते. 

ती शेतजमिन मूळ मालकाच्या नावावर झाली असता ती खरेदीखत तयार करुन देण्यासाठी चौधरी हे विनायक ठाकूर व पांडूरंग पाटील यांची सतत भेट घेत तुम्हाला संपूर्ण रक्कम दिली आहे मला खरेदीखत करुन द्या अशी विनंती करीत होते. याबाबत त्यांनी ऍड. राजेश सोनवणे यांच्यामार्फत ६ ऑक्टोंबर २०२० रोजी नोटीस पाठविली परंतू त्यांनी ही नोटीस घेण्यास नकार दिला होता.

चौधरी यांनी विनायक ठाकूर व पांडुरंग पाटील यांची ४ मार्च २०२१ रोजी शेतजमिन खरेदी करुन द्यावी अन्यथा तुमच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करेल अशा आशयाची नोटीस पाठविली होती. परंतु त्या दोघांकडून नोटीसीला कुठलेच उत्तर मिळाले नाही. तसेच बेचनपातीनुसार शेतजमिन खरेदी करणे बंधनकारक असतांना जमिनीचे भाव वाढलेले असल्याने अतिरीक्त पैशांच्या मागणी करुन रमेश चौधरी यांच्या फिर्यादीवरुन विनायक भालचंद्र पाटील रा. एरंडोल व पांडूरंग दगा पाटील रा. गिरणा कॉलनी चोपडा या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Protected Content