मोठी बातमी : एमआयडीसी पोलीसांचे कोम्बिंग ऑपरेशन : रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाकडून एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी २८ एप्रिल रोजी रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यावेळी हद्दपार, चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्यांसह स्टॅण्डींग वॉरंट असलेले रेकॉर्डवरील ६ गुन्हेगारांना अटक करण्यात आले आहे. तसेच नाकाबंदी दरम्यान, १३ वाहनांवर कारवाई करण्यात आली. अशी माहिती एमआयडीसी पोलीसांनी मंगळवारी ३० एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

याबाबत अधिक असे की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी कोम्बिंग ऑपरेश राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शोध पथकाकडून रविवारी २८ एप्रिल रोजी रात्री कोम्बिंग ऑपरेशर राबविण्यात आले. यावेळी दोन वर्षांसाठी हद्दपार असलेला उदय रमेश मोची रा. रामेश्वर कॉलनी याला मध्यरात्री १ वाजता मेहरुण परिसरातून अटक केली. घरफोडीच्या उद्देशाने फिरत असलेला राहुल जिवन पांडे रा. सुप्रिम कॉलनी याला मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास टायटन कंपनीजवळून ताब्यात घेतले. तर अजय बिरंजु गांरुगे रा. तांबापुरा दोन वर्षापासुन स्टॅण्डिग वॉरट मध्ये फरार होता. त्याला देखील तांबापूरातून अटक करण्यात आली. या शिवाय भोला राकेश बांगडे रा. सुप्रिम कॉलनी, विशाल भागवत सुरवाडे, गोलु उर्फ राजकिसन मानसिंग परदेशी, आबा मधुकर पाटील तिघे रा. रायपुर, कुसुबा, यांच्या विरुध्द न्यायालयाकडील अजामीन पात्र वॉरन्ट होते. त्याप्रमाणे त्यांना ताब्यात घेवुन कारवाई करण्यात आली यासह एमआयडीसी पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील १३ हिस्ट्रिशीटरांची तपासणी करण्यात आली. दरम्यान, १३ वाहन चालकांवर कारवाई करुन त्यांच्याकडून ९०० रुपयांचा दंड वसुल केला.

या पथकाची कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, पोलीस निरिक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि आसाराम मनोरे, पोउनि रवींद्र गिरासे, दत्तात्रय पोटे, पोउनि संजयसिंग पाटील, सफौ अतुल वंजारी, पोहेकॉ अनिल तायडे, पोहेकॉ मंगेश बागुल, दिनेश चौधरी, संदीप सपकाळे सचिन पाटील, योगेश बारी, चेतन सोनवणे, सतिष गजें, सिध्देश्वर डापकर, चंद्रकांत पाटील, गणेश वंजारी यांच्या पथकाने केली.

Protected Content