लोखंडी सुरा घेवून दहशत माजविणाऱ्या दोघांना अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार असतांना विना परवाना जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीत येवून हातात लोखंडी सुरा घेवून दहशत माजवित असतांना एमआायडीसी पोलीसांनी कारवाई करत दोन अट्टल गुन्हेगारांना सोमवारी २९ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता अटक केली आहे. त्यांच्याकडून लोखंडी सुरा जप्त करण्यात आला असून सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदय रमेश मोची (वय २०) व सचिन उर्फ टिचकुल्या कैलास चौधरी (वय २४) दोन्ही रा. रामेश्र्वर कॉलनी असे अटक केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील रामेश्र्वर कॉलनीत सचिन उर्फ टिचकुल्या चौधरी व उदय रमेश मोची या दोघांना पोलीस अधीक्षकांनी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. मात्र ते दोघेही कोणतीही परवानगी न घेता शहरात वास्तव्यास करतांना आढळून आला. शिवाय दोघेजण हातात लोखंडी सुरा घेवून परिसरात दहशत माजवित असल्याची माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी सोमवारी २९ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता कारवाई करत दोघांना अटक केली. त्यांच्याकडून लोखंडी सुरा जप्त केला आहे. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोहेकॉ विकास सातदिवे आणि गणेश शिरसाळे हे करीत आहे.

Protected Content