वरखेडी रोडवरील भवानी नगर भागात सार्वजनिक शौचालयाचे तीन तेरा (व्हिडीओ)

नगरपालिका प्रशासना विरोधात स्थानिकांचा तीव्र संपात

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील वरखेडी रोडवरील भवानी नगर भागात गेल्या तीन वर्षांपूर्वी नगरपालिका प्रशासनाने स्वच्छ स्वर्वेक्षण लिग – २०२० अंतर्गत लाखो रुपये खर्चून सार्वजनिक शौचालय बांधले असून या शौचालयाची दुरावस्था झाली आहे. नगरपालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असून समस्या तात्काळ न सोडविल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

याबाबत प्रभागाचे नगरसेवक यांनी वारंवार नगरपालिका प्रशासनास निवेदन देवून तसेच बैठकीत सुद्धा येथील समस्यांचा पाढा वाचला होता. परंतु नगरपालिका प्रशासन या विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र समोर आले आहे. या भागातील समस्या तात्काळ न सोडविल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ही यावेळी मा. नगरसेवक सतिष चेडेसह स्थानिकांनी दिला आहे.

स्वच्छ स्वर्वेक्षण लिग योजने अंतर्गत शहरातील वरखेडी रोडवरील भवानी नगर भागात महिला व स्थानिकां गेल्या तीन वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्चून १५ पुरुष व १५ महिला अशा ३० खोल्यांचे सार्वजनिक शौचालय बांधण्यात आली होती. मात्र झालेले काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याने शौचालयाचे तीन तेरा वाजले आहे.

शौचालयातील खोल्यांचे दरवाजे तुटलेले, ड्रेनेज लिकेज, गटारीची समस्या, पथदिव्यांची समस्या, दासांचा उपद्रव या समस्यांमुळे स्थानिक रहिवाशांचे जगणे कठीण झाले आहे. प्रशासनास निवेदने व तोंडी सुचना देऊनसुद्धा समस्यांचे निराकरण होत नसल्याने स्थानिक महिला व नागरिक यांच्यामध्ये नगरपालिका प्रशासनाविरोधात नाराजीचा सूर बघावयास मिळत आहे. या समस्या लवकरात लवकर सोडविण्यात आल्या नाही तर नगरसेवक सतिष चेडे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका कार्यालयावर जण आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

व्हिडीओ लिंक :
https://fb.watch/d4MryvJmwA/

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!