Home क्राईम आयुध निर्माणी वसाहतीत विद्यार्थीनीची गळफास घेवून आत्महत्या

आयुध निर्माणी वसाहतीत विद्यार्थीनीची गळफास घेवून आत्महत्या

0
105


वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथून जवळ असलेल्या आयुध निर्माणी वसाहतीत १९ वर्षीय विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची घटना सकाळी उघडकीला आली आहे. वरणगाव पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वरणगाव येथील आयुध निर्माणी वसाहतीमधील मॉडिफाइड क्वार्टर नंबर-१९४ येथे  आकांशा शरद पगारे (वय-१९) ही तरूणी वडील, आई, भाऊ दोन बहीणी यांच्यासह वास्तव्याला होती. आकांक्षाने घराच्या गच्चीवर ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार १८ मे रोजी सकाळी उघडकीला आली.  सदर मुलगी दिपनगर येथे आयटीआय शिकत होती. आकांक्षा बराच वेळापासून न दिसल्याने तिची बहीण वर्षा गच्चीवर शोधण्यासाठी गेली असतांना ती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली . तेव्हा तिला खाली गळफासाची  ओढणी कापून खाली उतरवुन फॅक्टरी दवाखान्यात नेले असता, डॉ समीर महाकाळे यांनी मयत झाल्याचे सांगितले. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. तिचे शव विच्छेदन वरणगांव ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले आहे. याप्रकरणी मयत आकांक्षा चा भाऊ वैभव पगारे यांनी वरणगांव पोलीस ठाण्यात खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .


Protected Content

Play sound