यावल येथे महापुरुषांना आदरांजली

यावल प्रतिनिधी । शहरातील युवकांच्या वतीने विविध ठिकाणी लोहपुरुष सरदार वल्ल्भभाई पटेल, महर्षी वाल्मीक जयंती आणि माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमीत्ताने प्रतीमा पुजन करून आदरांजली वाहण्यात आली आहे.

येथील बेस्ट फ्रेंड गृपच्या वतीने येथील तालुका खरेदी विक्री संघाच्या आवारात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल,आद्य कवि महर्षी वालमीकी, माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतीमेचे पुजनाचा कार्यक्रम आयोजीत केला होता अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज़िल्हा परिषद चे गटनेते प्रभाकर सोनवणे, पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील, माजी नगरसेवक भगतसींग पाटील , राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले, प्रमोद नेमाडे उपस्थीत होते. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी आद्य कवि महर्षी वाल्मीकींनी काव्यात्मक रामायणाची रचना करून नात्यातील प्रत्येक आदर्श पात्र कसे असावे या सह आदर्श राजा कसा असावा ही संसकृती हिंदु धर्मास दिली आहे.

ज़िल्हा परिषद गटनेते प्रभाकर सोनवणे, शेखर पाटील, भगतसींग पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त करून देशाच्या थोर पुरूषांना आदरांजली वाहिली. कार्यक्रमास नगरसेवक अभीमन्यू चौधरी , माजी नगरसेवक असलम शेख , यावल नगर परिषदचे उपनगराध्यक्ष राकेश केलते यांनी कार्यक्रमाचे संत्रसंचलन केले गणेश महाजन, भरत कोळी, एजाज पटेल व आदी युवक मित्रमंडळींनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमास कॉग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, सुकदेव नाना बोदडे, हितेश गजरे, पुंडलीक बारी, चंद्रकला इंगळे, हाजी गफफारशाह, मुबारक तडवी, आदिसह शहरातील नागरीक उपस्थीत होते. येथील सम्राट मॉलमध्ये आयोजीत तीन ही महापुरूषांच्या प्रतीमेचे पुजन करण्यात आले.

Protected Content