भाविकांच्या चैतन्यमयी वातावरणात रंगला शिव पार्वती विवाह सोहळा

तरुण कुढापा मंडळातर्फे श्री शिवमहापुराण कथा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील तरुण कुढापा मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे धार्मिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी संगीतमय श्री शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री शिवमहापूराण कथेत शुक्रवारी श्री शिव पार्वती विवाह सोहळ्यानिमित्त सजीव आरास करण्यात आली. तरुण कुढापा मंडळातील कार्यकर्त्यांनी सहभागी होत विविध वेशभूषा केली. सर्व देवी देवता तसेच शिव लग्नाच्या वरातीतील भुतांचा नृत्याचा देखावा यात दाखवण्यात आला. शिव पार्वती विवाह सोहळ्याची कथा व सजीव आरास भाविकांच्या उत्साहात पार पडली.

सोमवारी २५ डिसेंबर रोजी भाविकांच्या उत्साहात श्री शिव महापुराण कथेला प्रारंभ झाला. ही कथा ३१ डिसेंबरपर्यंत असून १ जानेवारी रोजी सकाळी गोपाळकाल्याचे किर्तन होऊन समारोप होणार आहे. कथा दुपारी १ वाजेपासून हभप देवदत्त महाराज मोरदे हे सांगत आहेत. भगवान शिव यांची महाआरती जयेश भावसार, सुनील भारंबे, हिमांशू सोनी, सागर पाटील, प्रमोद शिंपी, मुरली प्रतिहार यांच्या हस्ते झाली.

Protected Content