नेदरलँडच्या ‘अल्मेरे’त घुमला शिवरायांचा जयजयकार

पहूर ता. जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सातासमुद्रापार नेदरलँडच्या भूमीत छत्रपतींचा जयजयकार घुमला . निमित्त होते शिवरायांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिन सोहळ्याचे अवघ्या विश्वाला वंदनीय असणाऱ्या छत्रपती शिवरायांचा साडेतीनशे वर्षांपूर्वी स्वराज्याची राजधानी रायगडावर राज्याभिषेक झाला अन् शिवराय छत्रपती झाले. सातासमुद्रापार असलेल्या नेदरलँड या युरोपीय राष्ट्रात मराठी माणसांनी उभारलेल्या ‘अल्मेरे महाराष्ट्र मंडळाने ‘ शिवराज्याभिषेक दिन मोठ्या हर्षोल्हासात साजरा केला. भगव्या पताका हाती धरून ऐतिहासिक शिवकाळ जागा करत छत्रपतींचा जय घोष घुमला . महाराष्ट्रातून नेदरलँड देशात नोकरी व्यवसायानिमित्त गेलेल्या मराठी जणांनी अल्मेरे येथे महाराष्ट्र मंडळ स्थापन केले आहे. या मंडळाच्या माध्यमातून नेदरलँड मधील मराठी माणसांना एका धाग्यात बांधण्याची कार्य केले जात आहे.

अल्मेरे महाराष्ट्र मंडळ, विविध महाराष्ट्रीय परंपरा सांस्कृतिक सण उत्सव साजरे करून आपली माती आणि नाती जपण्याचं कार्य करीत आहेत .अल्मेरेमध्ये घरापासून दूर असलेल्या महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती जपण्याचा अल्मेरे महाराष्ट्र मंडळाचा उद्देश आहे. मकरसंक्रांती, गुढीपाडवा, दिवाळी या सारखे पारंपारिक सण साजरे करण्यासाठी अल्मेरे आणि अल्मेरच्या आजुबाजुच्या भागातील मराठी भाषेत कुटुंबे आणि मराठी संस्कृतीशी असलेली कुटुंबे एकत्र आणण्याचा मंडळाचे ध्येय आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रम दरम्यान आपल्यातील लपलेल्या प्रतिभेला प्रोत्साहन देणे आणि संधी उपलब्ध करून देणे हे मंडळाचा उद्देश आहे.

अल्मेरे महाराष्ट्र मंडळाची स्थापना नेदरलँड्समध्ये स्थायिक बिपीन पाटील(मुंबई) दिपाली पाटील (बुलढाणा) उदय परमाळे, स्वाती परमाळे (पुणे) आणि हर्षद इनामदार व कीर्ती इनामदार (कोल्हापूर) यांनी केली. विशेष म्हणजे नेदरलँड्स मधील अल्मेरे येथे संपन्न झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्यात जामनेर तालुक्यातील टाकरखेडा येथील जि.प मराठी शाळेत कार्यरत असलेले ग्रेडेड मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांची कन्या सौ. निशा पाटील यांनी सहभाग घेतला. सदर कार्यक्रमास स्वप्नील पाटील, (पनवेल) पी.टी.पाटील आणि मिराबाई पाटील (जामनेर) तसेच महाराष्ट्रातून शेकडो लोक उपस्थित होते.

Protected Content