१४.५६ कोटीच्या निकृष्ट डब्ल्यूबीएम रस्त्याच्या कामाची चौकशी करा; बहुजन मुक्ती पार्टीचा आरोप

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | उपसा सिंचन बांधकाम विभागाअंतर्गत वरणगाव तडवेल उपसा सिंचन योजनेअंतर्गत ओझरखेड ते माळेगाव धरणाच्या बाहेरील बाजूस सुरू असलेल्या १४ कोटी ५६ लाखांच्या डब्लूबीम रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट होत असल्याचा आरोप बहुजन मुक्ती पार्टीचे राज्य संघटक प्रमोद सौंदळे यांनी पत्रकार परिषदद्वारे केला आहे.

ओझरखेड धरणाच्या बाहेरील बाजूस डब्ल्यूबीएम रस्त्याची निविदा १४ कोटी ५६ लाख एवढ्या मोठ्या प्रचंड रकमेची का काढण्यात आली हा परिसरातील शेतकऱ्यांसाठी संशोधनाचा विषय ठरत आहे कारण सदरील रस्त्यासाठी लागणारे सर्वच मटेरियल मुरूम माती हे धरणपरिक्षेत्रातील असून तसेच त्यावर लागणारी गिट्टी सुद्धा धरण परिक्षेत्रात क्रशर मशीन सुरू करून तिथूनच उपलब्ध करण्यात येत आहे व फक्त वाहतूक ,वाटर रोलिंग कॉम्प्रेशन,चा खर्च कोट्यावधींचा घरात कसा गेला हे न उलगडणारे कोडे ठरत आहे कारण जळगाव जिल्ह्यातील इतिहासातील सर्वात जास्त किमतीचा डब्ल्यूबीएम रोड तापी पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत करण्यात आलेला आहे.

सदर काम प्रगती प्रथावर असतानाच दुर्दशा झालेली असून यासंदर्भात शेतकऱ्यांसह विविध सामाजिक तसेच राजकीय संघटना संबंधित विभागीय अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करत आहोत. परंतु उपसा सिंचन बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला जिल्ह्यातील एका बड्या मंत्र्याचा असलेला आशीर्वाद सदर रोडच्या वाईट अवस्थेला कारणीभूत असल्याची चर्चा परिसरात आहे. सदरील रस्त्यासाठी मागील वर्षी तापी पाटबंधारे विकास महामंडळामार्फत टेंडर मॅनेज झाल्यामुळे वाद विकोपाला जाऊन पोलीस तक्रार सुद्धा करण्यात आलेली असल्याच्या बातम्या इलेक्ट्रिक तसेच प्रिंट माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या व त्यामुळे सदर टेंडर रद्द करण्यात आले होते यावरूनच सगळा आर्थिक घोळ लक्षात येत आहे. तसेच तापी पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत बऱ्याच शेकडो कोटींच्या निविदा तक्रारीच्या अनुषंगाने सुद्धा रद्द करण्यात आलेल्या आहेत व तशा बातम्या लोकप्रिय वृत्तपत्रांमध्ये वारंवार प्रसिद्ध होत आहे. ओझरखेडा ते माळेगाव चे डब्ल्यूबीएमचे काम अंदाज पत्रकानुसार करण्यात येत नसून सदर रोड बनवताना कोणतेही खोदकाम करण्यात आलेले नसून ज्या ठिकाणी खोदकाम करण्यात आलेले आहे ते फक्त फोटोसेशन, क्वालिटी कंट्रोल च्या रिपोर्ट पुरतेच करण्यात आलेले आहे. सदर डब्ल्यूबीएम रोड निकृष्ट होण्याचे कारण म्हणजे रोडवर टाकण्यात येणाऱ्या मटेरियल मध्ये काळी माती फार मोठ्या प्रमाणात टाकण्यात येत असून ती लपवीण्यासाठी त्यावर पुन्हा मुरूम मिश्रित माती टाकण्यात येत आहे.

सदर रोडवर व्हायब्रेटिंग वॉटर रोलिंग कॉम्प्रेशन अंदाजपत्रकानुसार दर एक फुटाचा लेअर टाकल्यानंतर त्यावर रोलिंग कॉम्प्रेशन करणे बंधनकारक होते परंतु तसे न करता थातूरमातूर पद्धतीने टँकरने पाणी मारून दहा दहा फुटांवर उंचीवर नावापुरते रोलर फिरवण्यात येत आहे हा भोंगळ कारभार फक्त रात्रीच्या वेळेस सुरू असून रात्रीच्या वेळेस अंधारात कोणत्याही पर्यवेक्षक अधिकाऱ्यांची तिथे उपस्थिती नसते अधिकाऱ्यांची उपस्थिती ही फक्त दिवसा ठराविक वेळेपूर्ती असून फोटोसेशन झाल्यानंतर अधिकारी तिथून निघून जातात व हा १४ कोटी ५६ लाखांचा रोड ठेकेदाराच्या सुपूर्त केला जातो व त्यामध्ये विभागीय अधिकाऱ्यांचा ठेकेदाराशी असलेली आर्थिक भागीदारी असल्याची चर्चा परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आहे. तरी सदर रोड पुन्हा अंदाजपत्रकानुसार करण्यात यावा अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीचे राज्य संघटक प्रमोद सौंदळे यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली आहे

Protected Content