शेतातून दोन पाणबुडी पंपाची चोरी; गुन्हा दाखल

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील फाफोरे शिवारातील शेत गट क्रमांक ३५ मधील शेतातून अज्ञात चोरट्यांनी ११ हजार रूपये किंमतीच्या दोन पानबुडी पंप चोरून नेल्याचे १५ मे रोजी सकाळी १०.३० वाजता उघडकीला आले. याप्रकरणी सोमवारी १० जून रोजी रात्री १० वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, मनोहर प्रभाकर पाटील वय ४३ रा. फाफोरे ता. अमळनेर हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला असून शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे फाफोरे शिवारातील शेत गट क्रमांक ३५ मध्ये शेत आहे. या शेतात ठेवलेले ११ हजार रूपये किंमतीच्या दोन पाणबुडी पंप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे १५ मे रोजी सकाळी १०.३० वाजता उघडकीला आले. याप्रकरणी अखेर सोमवारी १० जून रोजी रात्री ११ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय पाटील हे करीत आहे.

Protected Content