मलावीचे उपराष्ट्रपती क्लाऊस चिलिमा यांचे विमान अपघातात निधन

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आफ्रिकन देश मलावीचे उपराष्ट्रपती सॉलोस क्लाऊस चिलिमा यांचे विमान अपघातात निधन झाले. मलावीचे राष्ट्रपती लाजरस चकवेरा यांनी याला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, 24 तासांच्या शोध मोहिमेनंतर उपराष्ट्रपतींच्या विमानाचे अवशेष सापडले. विमानात 9 जण होते. त्यापैकी कोणीही वाचले नाही.

सोमवार, 10 जून रोजी सकाळी मलावीच्या उपराष्ट्रपतींचे विमान रडारवरून बेपत्ता झाले होते. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, विमान वाहतूक प्राधिकरणाने अनेकवेळा विमानाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही.

चिलिमाच्या विमानाने मलावीची राजधानी लिलोंगवे येथून भारतीय वेळेनुसार सोमवारी दुपारी 2:47 वाजता उड्डाण केले. सुमारे 45 मिनिटांनी ते मुजू शहर विमानतळावर उतरणार होते. मात्र, खराब हवामानामुळे ते उतरू शकले नाही. यानंतर विमान लिलोंगवेला परत घेण्याचे आदेश देण्यात आले. यानंतर हे विमान बेपत्ता झाले. विमानाचा शोध घेण्यासाठी मलावीने अमेरिका, ब्रिटन, नॉर्वे आणि इस्रायलच्या सरकारांचीही मदत मागितली होती.

Protected Content