बापलेकाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील बहाळ गावात लग्न समारंभाचे साहित्य ताब्यात देण्याच्या कारणावरून एका वृध्दासह त्यांच्या मुलाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. ही घटना ७ जून रोजी सकाळी ९ वाजता घडली. याप्रकरणी सोमवारी १० जून रोजी दुपारी १ वाजता मेहुणबारे पोलीसात मारहाण करणाऱ्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील बहाळ गावात लग्नाचे भांडे व साहित्य ताब्यात देण्याच्या कारणावरून रोशन अली बरात अली काझी यांच्यात काही जणांनी ७ जून वाद घातला. या वादातून रोशन अली बरात अली काझी व त्यांचा मुलगा मुदस्सर अली रोशन अली या दोघांना गावात राहणारे भिकन अली कुरबान काझी, नदीम अली माशुक अली काझी, साहेबाज अली भिकन अली काझी, अय्युब अली कमर अली काझी, रूकसानाबी भिकन अली काझी, सैयनाजबी मासुक अली काझी सर्व रा. बहाळ यांनी शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून दुखापत केली. याप्रकरणी सोमवारी १० जून रोजी दुपारी १ वाजता मेहुणबारे पोलीसात तक्रार देण्यात आली. त्यानुसार मारहाण करणारे भिकन अली कुरबान काझी, नदीम अली माशुक अली काझी, साहेबाज अली भिकन अली काझी, अय्युब अली कमर अली काझी, रूकसानाबी भिकन अली काझी, सैयनाजबी मासुक अली काझी सर्व रा. बहाळ ता. चाळीसगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ प्रताप मथुरे हे करीत आहे.

Protected Content