अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या संशयिताला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तांबापूरा परिसरात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा दारूच्या नशेत अश्लिल हावभाव करून विनयभंग केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी तबरेज ऊर्फ अच्छु ईब्राहीम शेख याला एमआयडीसी पोलीसांनी भडगाव येथून रविवारी १६ ऑक्टोबर रोजी दुपारी अटक केली आहे.

एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील तांबापूरा परिसरातील एका भागात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गुरूवार १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी तिच्या घरासमोर उभी असतांना तरबेज उर्फ अच्छु इब्राहिम शेख हा दारूच्या नशेत तिच्या घराच्या अंगणात उभा राहिला आणि मुलीकडे पाहून डोळा मारला. तसेच तिचा हात पकडून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला. याप्रकरणी संशयित आरोपी तरबेज उर्फ अच्छु इब्राहिम शेख याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित आरोपी तरबेज हा फरार होता. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पोहकॉ अल्ताफ पठाण, पो.कॉ. किशोर पाटील यांनी संशयित आरोपी तरबेज उर्फ अच्छु इब्राहिम शेख याला रविवारी १६ ऑक्टोबर रोजी भडगाव येथून अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहे.

Protected Content