बुलढाणा शहरानजिक बिबट्याचा वावर ; नागरिकामध्ये दहशतीचे वातावरण…

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरानजिक असलेल्या हनवतखेड परिसरात बिबट्याचा बिनधास्त्त वावर असल्याचं समोर आला आहे. त्यामुळे मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

 

शहरानजीक असलेल्या राजूर घाटातील जंगलात असंख्य हिंसक प्राणी अस्तित्वात आहेत.आणि शहराचा विस्तार वाढत चालला आहे. त्यामुळे जंगलातील प्राणी शहराजवळ येऊ लागली आहे. त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आल्याचे दिसून येत आहे. शहरानजीक वावर असलेल्या बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी वन विभागाकडे करण्यात येत आहे.

 

Protected Content