खडसे महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालय मुक्ताईनगर येथील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिवसाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एच. ए. महाजन हे होते तर कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून श्रीमती अर्चना भोळे जे. ई. स्कूल व ज्यु. कॉलेज मुक्ताईनगर या उपस्थित होत्या त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना अतिशय सखोल असे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांची मने जिंकली. आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांनी कायमच पुस्तकांच्या संपर्कात राहून ग्रंथ आपले मित्र कसे होतील यासंदर्भामध्ये प्रयत्नशील राहिले पाहिजे जेणेकरून त्यांच्या माध्यमातून आपल्या ज्ञानामध्ये भर पडेल आणि समाजाचा विकास घडून येईल त्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्नशील असणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.

प्रास्ताविक डॉ. संजीव साळवे विद्यार्थी विकास अधिकारी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. प्रतिभा ढाके महिला विद्यार्थी विकास अधिकारी यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.वैष्णवी जंगले या विद्यार्थिनीने केले. कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. डांगे त्याचप्रमाणे डॉ. बाविस्कर व डॉ. ताहिरा मिर यांची आवर्जून उपस्थित होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभम गायकवाड, निखिल रायपुरे, पियुष बडोगे, वैष्णवी जंगले,निकिता झांबरे,ऋषिकेश वानखेडे, शितल भोई,सपना वंजारी व विद्यार्थी विकास विभागाच्या संपूर्ण विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Protected Content