चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

मुक्ताईनगर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा फाट्याजवळ ४ चाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात कार वरील अज्ञात चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरुण आप्पा तायडे (वय-५५) रा.गडकरी नगर, भुसावळ असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

 

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अरुण तायडे हे ११ जुलै रोजी दुपारी १२ वाजता त्यांची दुचाकी (एमएच १९ एडब्ल्यू २७७५) ने कामाच्या निमित्ताने भुसावळवरून मुक्ताईनगरकडे त्यांचा मित्र चंद्रकांत मालविया यांच्यासोबत जात होते. त्यावेळी मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा फाट्याच्या वरून जात असताना पाठीमागून येणारी चार चाकी वाहन (एमएच १९ बीयू ४७०७) वरील चालकाने त्यांना जोरदार धडक दिली. त्यांनी दिलेल्या धडकेत अरुण तायडे हे जमिनीवर पडून जखमी झाले. यावेळी सोबत असलेला त्यांचा मित्र चंद्रकांत मालवीया हे देखील दुःखात जखमी झाले. दरम्यान घटना घडल्यानंतर कार वरील अज्ञात चालक हा कार घेऊन पसार झाला होता. या घटनेबाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी पुढील तपास पोलीस विजय पढार करीत आहे.

Protected Content