चोपड्यात वीज कंपनी कार्यालयावर भाजपाचे आंदोलन

चोपडा प्रतिनिधी । शेतकऱ्यांना कोणतीही पूर्व सुचना न देता त्यांचे शेतीच्या वीज जोडण्या तोडण्याची कारवाई महावितरण अधिकाऱ्यांनी त्वरित थांबवावी यासाठी चोपडा तालुका भाजपने वीज कंपनीच्या कार्यालय परिसरात आंदोलन केले. 

तालुकाध्यक्ष पंकज पाटील व शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल यांच्या हस्ते महावितरण अधिकार्‍यांना निवेदन सादर करण्यात आले.तसेच महाविकास आघाडी सरकारचा चुकीच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. निवेदनात प्रामुख्याने शेतकर्‍यांना कोणतीही पूर्व सुचना न देता त्यांचे शेतीचे वीज कनेक्शन तोडण्यात येत आहे, आम्ही विजबिलावरील इतर आकार व व्याज माफ करून थकलेले वीज बील भरण्यासाठी सवलत देऊ असे सांगितले होते, पण वस्तुस्थिती पाहता असे काहीच होत नाही, निम्मे वीजबिल भरण्यासाठी शेतकर्‍यांकडे तगादा लावलाय,कोणतीही पूर्व सुचना न देता संपुर्ण डीपी बंद करून नाहक शेतकर्‍यांना त्रास दिला जातोय.आदि प्रश्नांचे निवेदन सादर करण्यात आले. त्याचप्रमाणे या दिलेल्या निवेदनावर राज्यातील महाआघाडी सरकारने निर्णय न घेतल्यास, शेतकर्‍यांना दिलासा न दिल्यास, आगामी काळात भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन करेल. त्या आंदोलनाला राज्यातील हे शेतकरी विरोधी सरकार जबाबदार राहील असा इशारा ही देण्यात आला. 

 

याप्रसंगी जिल्हा चिटणीस रंजना नेवे,तालुका सरचिटणीस हनुमंतराव महाजन, मनोहर बडगुजर,कृउबा संचालक  धनंजय पाटील, अल्पसंख्याक अध्यक्ष संजय जैन, उपाध्यक्ष माधुरी अहिरराव, भारती क्षीरसागर, आशिष पाटील, प्रविण चौधरी, विधी आघाडी अध्यक्ष शैलेश शर्मा, युवा मोर्चा शहराध्यक्ष तुषार पाठक, अनु.जाती/जमाती अध्यक्ष राज घोगरे, कोषाध्यक्ष धिरज सुराणा, कार्यालय मंत्री मोहित भावे, अमित तडवी, विशाल भोई, अजय भोई, तेजस जैन, अमित देशमुख, विशाल भावसार, मेहुल शिरसाठ, राहुल माळी, गेमेंद्र ठक्कर, विठ्ठल बडगुजर, सुनिल कासार, कृष्णा बाविस्कर, कैलास माळी, घनश्याम धनगर आदि पदाधिकारी व तसेच मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content