चला आमदार राजूमामा शोधू या ; आयोजकांसह सहभागी नेत्यांना पडलेला प्रश्न (व्हिडिओ)

 

जळगाव, प्रतिनिधी । रोटराक्टतर्फे ‘चला विकास शोधू या’ या उपक्रमांतर्गत सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची निर्धारित वेळ सकाळी १०.३० वाजेची होती. मात्र, आमदार सुरेश भोळे हेच वेळेत उपस्थित न राहिल्याने चर्चा आटोपती घेण्यात आली.

‘चला विकास शोधू या’ कार्यक्रमाला आमदार सुरेश भोळे व महापौर सौ. भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, माजी महापौर विष्णू भंगाळे, शिवसेना गटनेते अनंत जोशी, जेष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे, राष्ट्रवादी महानगर जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते.

शिवसनेचे विष्णू भंगाळे, अनंत जोशी, गजानन मालपुरे, राष्ट्रवादीचे अभिषेक पाटील व इतर पदाधिकारी व नागरिक हे निर्धारित वेळेपेक्षा आधीच हजर झाले होते. मात्र, आ. सुरेश भोळे हे निर्धारित वेळेत हजर न झाल्याने कार्यक्रमास उशीर होत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करून कार्यक्रमातून जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, याच वेळी महापौर व उपमहापौर हे हजर झाल्याने आयोजकांनी कार्यक्रमास सुरुवात केली. चर्चासत्र सुरु होऊन जवळपास १ तास उलटूनही आमदार भोळे न आल्याने माजी महापौर विष्णू भंगाळे, शिवसेना गटनेते अनंत जोशी, राष्ट्रवादी महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांनी वाक आउट केले. तर शहराच्या विकासाबाबत चर्चा सुरु असतांना आमदार हजर नसल्याने आमदार साहेब हाय हाय अशा घोषणा देण्यात येत होत्या.

रोटराक्टने हा छान उपक्रम राबविला यात शहरातील नागरिक देखील आले होते त्यांना समस्यांना वाचा सुटायला पाहिजे यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, आमदार पावणे आकरा वाजेपासून पाच मिनिटांत येतो, दोन मिनिटांत येतो असे सांगत आहेत. आता १२ वाजून ५१ मिनिटे झाली आहेत. आमदार आता जळगावच्या जनतेसमोर उत्तर द्यायला घाबरायला लागले असल्याचा आरोप अभिषेक पाटील यांनी केला.

आमदार भोळे चर्चा संपल्यावर सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात आले. व्यस्त कार्यक्रमामुळे त्यांना उशीर झाल्याबद्दल त्यांनी दिलीगिरी व्यक्त केली.

 

भाग १
https://www.facebook.com/508992935887325/videos/967714423637343

भाग २
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/392638172069193

Protected Content