महाविद्यालयीन व स्पर्धा परीक्षेचा पेपर एकाच दिवशी असणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा

एम.जे. महाविद्यालय विद्यार्थ्यांचा पेपर नंतर घेणार

जळगाव प्रतिनिधी | मु.जे महाविद्यालयाचा पदव्युत्तर विद्यार्थ्याचा पेपर व लोकसेवा आयोग (MPSC) यांचा मार्फत घेण्यात येणाऱ्या पेपराचे एकाच दिवशी आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थीहिताचा विचार करत सदर विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून त्यांची महाविद्यालयीन परीक्षा नंतर घेण्यात येणार आहे.

रविवार, दि.२३ जानेवारी २०२२ रोजी मु.जे महाविद्यालयाचे पदव्युत्तर विद्यार्थ्याचे (कला शाखेचा ) पेपर आपण आयोजन केलेल आहे. तसेच त्याच दिवशी राज्य लोकसेवा आयोग (MPSC) यांचा मार्फत घेण्यात येणाऱ्या विविध पदांसाठी आयोजन करण्यात आलेले होते

महाविद्यालयाचे तसेच आयोगने एकाच दिवशी स्पर्धेचं आयोजन केलं आहे. यामधे विद्यार्थ्याना दोन्ही पैकी एका परीक्षा देण्याच मुभा होती. तरी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन पदाधिकाऱ्यांनी कॉलेजच्या प्राचार्यांची भेट घेतली व विद्यार्थीहित समोर ठेवून “सर्व विद्यार्थ्यासाठी एम.ए.च्या त्यादिवशी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या. अन्यथा राहिलेल्या विद्यार्थ्यांनच्या परीक्षा नंतर घ्यावा.” अशी मागणी केली.

मु.जे महाविद्यालयाचे प्राचार्य स.ना.भारंबे यांनी ह्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन विद्यार्थ्यांनचे कुठलेही नुकसान होणार नाही अशी ग्वाही दिली आहे. ह्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाकडून सोमवारी एक गुगल फॉर्म प्रसारित केला जाणार आहे. त्यावर विद्यार्थ्यांनी आपली माहिती भरून तो फॉर्म भरावा व ह्या विद्यार्थ्यांनची परीक्षा महाविद्यालय नंतर घेणार आहे. असे सांगण्यात आले. या वेळी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे जिल्हाध्यक्ष रोहन महाजन यासह भावेश पाटील, पवन पाटील, ऋषिकेश देशमुख उपस्थित होते

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.