अकोला, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात पुन्हा लॉकडाउनचा विचार

 

 

मुंबई : वृत्तसंस्था ।  कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने  अकोला, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये  पुन्हा लॉकडाउन लावण्याचा विचार केला जात आहे. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

 

“अमरावतीत रुग्णसंख्या वाढली आहे. जवळपास संपूर्ण कुटुंबाला ग्रासलं आहे. त्याच्यानंतर मी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व माहिती घेऊन सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव आणि संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावलं आहे. या बैठकीत या तीन शहरांसाठी काय निर्णय घ्यायचा? त्यात ग्रामीण भागही घ्यायचा का? यासंबंधी चर्चा होणार आहे,” अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

 

अजित पवारांना अरुण राठोडला ताब्यात घेतलं आहे का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “पोलिसांकडे चौकशी करण्यास सांगण्यात आलं आहे. आम्ही त्यात कोणतीही मध्यस्थी करत नाही. चौकशी जोरात सुरु आहे. त्यातून काय सत्य आहे ते बाहेर येईल. काहींना ताब्यात घेतल्याची ऐकीव माहिती आहे. मी काही पोलिसांशी संपर्क साधला नाही. कारण नसताना आम्ही सारखं फोन करुन संपर्क साधला त्यात राजकीय हस्तक्षेप होतो अशा गोष्टी बोलल्या जातात. त्यापेक्षा अतिशय निर्भीडपणे चौकशी करण्यासाठी आपण सांगितलेलं आहे”.

 

अजित पवार यांनी यावेळी वनमंत्री संजय राठोड गायब नसल्याचा पुनरुच्चार केला. आजच मी त्यांना फोन करुन यवतमाळमधील स्थितीबाबत चर्चा केली असल्याचं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.

Protected Content