चाळीसगाव कोविड रूग्णालयात आरोग्य कर्मचारी वाढवा- खा. उन्मेष पाटीलांची मागणी

चाळीसगाव प्रतिनिधी । कोरोनाचा वाढता प्रकोप बघता शहराची वाटचाल हॉटस्पॉटकडे होत असताना येथील महात्मा फुले जन आरोग्य संकुल शासकीय ट्रामा केअर सेंटर रूग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्यांचा तुटवडा भासत असून लवकरात लवकर आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती करण्यात यावी, अशी मागणी खासदार उन्मेश पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करून केली. 

शहरातील रेल्वे ब्रीज जवळ अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय दर्जाचे  महात्मा फुले जन आरोग्य संकुल शासकीय ट्रामा केअर सेंटर उभारण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याठिकाणी कोविड स्पेशल रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. नुकतीच खासदार उन्मेष पाटील यांनी कोविशिल्ड लस घेऊन रुग्णालयाची पाहणी केली असता. दरम्यान वैद्यकीय अधीक्षक डॉ. बाविस्कर येथे कर्मचार्यांची तुटवडा असल्याचे खासदार उन्मेष पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यावर लगेच खासदार उन्मेष पाटील यांच्या निदर्शनास आल्याने लवकरात लवकर आरोग्य कर्मचारी वाढविण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करून केली. जिल्हाधिकारी यांच्याशी बोलताना पंधरा ते पंचवीस कर्मचाऱ्यांची उपलब्धता करून द्यावे जेणेकरून अधिक प्रभावी रुग्णसेवा जनतेला बहाल करणे सोयीचे होईल असेही खा. उन्मेष पाटील यांनी दूरध्वनी वर चर्चा करून कळविले. यावेळी बोलताना डॉ. बाविस्कर उन्मेश दादा आपल्या भक्कम पाठपुरावा आणि दूरदृष्टीतून ही भव्य दिव्य वास्तू आपण साकारल्यामुळे आज शेकडो रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

Protected Content