किरकोळ कारणावरून दोघांना मारहाण; चौघांविरोधात गुन्हा

Crime l 3

चाळीसगाव प्रतिनिधी । किरकोळ करणावरून तिघांकडून दोघांना मारहाण केल्याची घटना घडली असून तिघांविरोधात चाळीसगाव शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत माहिती अशी की, शांताराम नंदलाल दुधेकर आणि सागर गवळी यांच्याजवळ आरोपी अमोल छगन गायकवाड, भूपेंद्र यशवंत सोनवणे, धनंजय भोसले, तुषार उर्फ चोंग्या आले. शांताराम दुधेकर आणि सागर गवळी यांनी आमच्याकडे का आले या कारणावरून चौघांना जिवे मारण्याची धमकी देऊन हातातील लोखंडी रॉड दगड लाकडी दांडा याच्याने शांताराम नंदलाल दुधेकर व सागर गवळी यांना डोक्यावर व पाठीवर मारून गंभीर दुखापत केली शिवीगाळ करत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली व त्यांना गंभीर दुखापत केली.

मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी शांताराम नंदलाल दुधेकर यांच्या फिर्यादीवरून अमोल छगन गायकवाड, भूपेंद्र यशवंत सोनवणे, धनंजय भोसले, तुषार उर्फ चोंग्या यांच्याविरोधात भादवि कलम 326 325 323 504 506 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाटील हे करीत आहेत.

Add Comment

Protected Content