मार्केट परिसरातून तरूणाची दुचाकी लांबविली

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील गोलाणी मार्केट परिसरातून तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी १० जून रोजी सायंकाळी ६ वाजता समोर आली. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुर्गेश महेंद्र नेवे रा. गोलाणी मार्केट जळगाव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. सोमवारी १० जून रोजी सायंकाळी ६ वाजता त्यांनी त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीएच ५३८६) ही गोलाणी मार्केटजवळील हनुमान मंदीराजवळ पार्कींगला लावलेली होती. अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. ही घटना समोर आल्यानंतर त्यांनी तातडीने शहर पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार सायंकाळी ७ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक सुधीर साबळे हे करीत आहे.

Protected Content