आता कोरोनावर उपयुक्त ठरणार्‍या मलमाची निर्मिती !

मुंबई । जगभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असतांनाच आता यावरील औषधी तयार करण्यालाही वेग आला आहे. या अनुषंगाने अमेरिकेतील एका औषध निर्मात्या कंपनीने अतिशय परिणामकारक अशा मलमाची निर्मिती केली असून याला युएस-एफडीएची मान्यता देखील मिळाली आहे.

कोरोनावरील लसींच्या चाचणीबाबत जगभरात स्पर्धा सुरू आहे. तीन लसींची अंतिम टप्प्यातील चाचणी सुरु असल्याचे पंतप्रधानांनी स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या भाषणातून सांगितल आहे. कोरोनावरील लस सर्वप्रथम शोधल्याचा दावा रशियाने केलाय. याच पार्श्‍वभूमीवर अमेरिकेतील फार्मा औषध कंपनीने करोना संपवण्यासाठी उपयुक्त असणारा मलम तयार केला आहे.

एफडीए नोंदणीकृत असलेल्या नॉन प्रिस्क्रिप्शन ओव्हर द काऊंटर या मलमने कोरोना वायरससहित अन्य विषाणुंच्या संक्रमणापासून देखील बचाव होईल, असा दावा करण्यात आला आहे. यासोबत उपचार आणि कोरोना संक्रमण संपवण्याची क्षमता या मलममध्ये असल्याचे सांगण्यात आले आहे.

या प्रकल्पाशी संबंधित वैज्ञानिकांनी सांगितले की एफडीए-नोंदणीकृत नॉन-प्रिस्क्रिप्शन ओव्हर काउंटर (ओटीसी) मलम, कोरोनाव्हायरससह विषाणूजन्य संसर्ग रोखण्यासाठी, उपचार करण्यास सिद्ध झाले आहे. यामुळे नाकातून कोरोनाव्हायरसची लागण होण्याची शक्यता कमी होईल असा दावा करण्यात आला आहे. मे आणि जूनमध्ये दोन महिन्यांपेक्षा जास्त चाचणी घेण्यात आली असून यात हे मलम उपयुक्त आढळून आले असून ते लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे.

Protected Content