जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना महिला आघाडीतर्फे आंदोलन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी संदर्भातील माहिती ही माहिती अधिकारात न मिळाल्याने शिवसेनेच्या महिला आघाडीच्या महानगरप्रमुख गायत्री सोनवणे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. तर जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या वतीने राज्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेच्या माध्यमातून गरजू रूग्णांना खासगी रूग्णालयात उपचार मिळण्याची सोय म्हणून निधी वितरीत करण्यात येतो. परंतू या निधीचा प्रश्न निर्माण होतील अशा पध्दतीने कार्यपध्दती समोर येत आहे. याबाबत महिती अधिकारात जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे माहिती मागितली होती.  परंतू शल्य चिकित्सव कार्यालयातून दिलेल्या उत्तर देण्यास टाळाटाळ करीत आहे. दरम्यान, लोकशाहीलाच धरून आणि लोकहित व जनहितासाठीच ही माहिती मागितली होती. त्यामुळे नाईजास्तव या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी २९ मे रोजी सकाळी ११ वाजता  एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे जळगाव शहरातील ज्या  खासगी रूग्णालयात ही योजना राबविली जाते. त्याची माहिती देण्यात यावी, किती रूग्णांना लाभ मिळाला, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून कक्षात रूग्णाच्या नावाने किती निधी मिळाला. याबाबत संपुर्ण तपसील मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे. दोन दिवसाच्या आत मागण्या मान्य न झाल्यास पुढील लढाई न्यायालयाच्या माध्यमातून लढविली जाणार असल्याची प्रतिक्रीया गायत्री सोनवणे यांनी दिली आहे.

Protected Content