पाकिस्तानात दोन अल्पवयीन हिंदू मुलीचे अपहरण

 

crime women 12

 

 

इस्लामाबाद (वृत्तसंस्था) पाकिस्तानच्या सिंध भागात होळी सणाच्या पूर्वसंध्येला दोन अल्पवयीन हिंदू मुलीचे अपहरण करण्यात आले असून त्यांना जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडल्याची घटना घडली आहे. या घटनेची भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने गंभीर दखल घेतली असून परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी भारतीय उच्च आयुक्तांना यासंबंधी रिपोर्ट देण्यास सांगितले आहे.

होळीच्या पूर्वसंध्येला हिंदू कुटुंबातील रवीना (वय १३) आणि रिना (वय १५) या दोन अल्पवयीन मुलीचे त्यांच्या घरातून अपहरण करण्यात आले. घोटकी जिल्ह्यात हा प्रकार अपहरण करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर उघडकीस आला. अपहरणानंतर त्यांचे धर्मांतर करण्यात आले असून त्यांचे बळजबरीने लग्न (निकाह) लावण्यात आले आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी यासंबंधीच्या वृत्ताला ट्विट करून माहिती मागितली आहे, असे म्हटले आहे. सिंध प्रांतात ही घटना उघडकीस आल्यानंतर हिंदू अल्पसंख्यकांनी जोरदार आंदोलन केले आहे. ही घटना घडल्यानंतरही पोलिसांनी जाणीवपूर्वक गुन्हा दाखल केलेला नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. अपहरणाविरोधात आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, असे हिंदू सेवा वेलफेअर ट्रस्टने म्हटले आहे.

Add Comment

Protected Content