जॅकलिन फर्नांडिसविरोधात आरोपपत्र दाखल

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत पुन्हा वाढल्या असून 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अभिनेत्रीला आरोपी ठरवले आहे. ईडीने अभिनेत्रीविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.

सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 200 कोटींच्या खंडणी प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, या आरोपपत्रात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे. अलीकडेच ईडीने जॅकलिनची सुमारे 7 कोटी 12 लाखांची एफडी जप्त केली होती. आरोपी म्हणून जॅकलिनचे नाव आल्याने आता तिच्या अडचणीत वाढ झाली आहे.

सुकेश चंद्रशेखरची सहकारी पिंकी इराणीने सुकेशला जॅकलीनला भेटायला लावल्याचेही आरोपपत्रात उघड झाले आहे. सुकेशने पिंकीच्या मदतीने जॅकलिनला महागड्या भेटवस्तू आणि रोख रक्कम दिली होती.
सुकेश चंद्रशेखरने डिसेंबर २०२० ते जानेवारी २०२१ दरम्यान जॅकलिन फर्नांडिसशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु अभिनेत्रीने त्याच्या फोनला प्रतिसाद दिला नाही, असेही ईडीच्या चार्टशीटने उघड केले.

 

Protected Content