मुक्ताईनगरातील स्व. निखिलभाऊ खडसे स्कूलमध्ये अमृत महोत्सव जल्लोषात साजरा

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, स्वर्गीय निखिलभाऊ खडसे सेमी इंग्लिश मेडियम स्कूल मुक्ताईनगर येथे, स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.

देशाच्या 75 व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव मंगलमय प्रसंगी संचालक मंडळाच्या सदस्य सौ. मंदाताई एकनाथरावजी खडसे कार्यक्रमाच्या अध्यक्षा यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण तर श्रीमती रक्षाताई निखिल खडसे लोकसभा खासदार तथा शाळेच्या सेक्रेटरी व संचालक मंडळाचे अध्यक्ष रमेश खाचणे, शाळेचे प्राचार्यव्ही. के. वडस्कर, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, सर्व प्रिय विद्यार्थी, विद्यार्थिनी त्यांचे पालक व परिवहन समितीचे अध्यक्ष प्रभू पाटील इतर सर्व सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वातंत्र्याचा महोत्सव शाळेत मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.

या मंगलमय प्रसंगी श्रीमती रक्षाताई निखिल खडसे यांनी स्वातंत्र्याच्या इतिहासापर व आजच्या आधुनिक परिस्थितीबद्दल तसेच हर घर तिरंगा, देशाची एकता अखंडता व देशाच्या भावी विकासाबद्दल आपल्या भाषणातून केले सर्वांचे उद्बोधन तथा सर्व विद्यार्थ्यांचा उत्साह, उमंग, चैतन्य बघून केले सर्वांचे कौतुक तर आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षांच्या पारितोषिकांचे वितरण यावेळी मंदाताई खडसे तथा अध्यक्ष रमेश खाचणे, शाळेचे प्राचार्य यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला संपन्न.

शाळेतील विविध विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे, नृत्य, गीत गायन, महापुरुषांच्या विविध वेशभूषा धारण करून कार्यक्रमाची वाढविलेली रंगात तर श्री अमोल सुतार सर, पूनम खेवलकर मॅडम, स्वप्निल सुधाकर चौधरी यांनी देशभक्तीपर गीते व भाषणे देऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार पाटील सर यांनी केले अशा प्रकारे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उमंगमय व अनमोल सहकार्यातून आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रम झाला संपन्न.

 

Protected Content