कारण नसतांना पिंप्राळा येथील तिघांना मारहाण फायटरने मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील अशोक टॉकीज जवळ काहीही कारण नसतांना पिंप्राळा येथील तरूणासह त्याच्या दोन मित्रांना शिवीगाळ करून फायटरने मारहाण करून जखमी केल्‍याची घटना घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी १६ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आकाश उर्फ प्रेम सुरेश वाघ (वय-२३) रा. पिंप्राळा हुडको, जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मजूरी करून आपला उदरनिर्वाह करतो. रविवार १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता आकाश वाघ हा त्यांचा मित्र सोनू रमेश शिरसाठ (वय-२०), संदीप सुभाष भालेराव (वय-२५) दोघे रा. पिंप्राळा हुडको, जळगाव यांच्यासह शहरातील अशोक टॉकीज जवळ कामाच्या निमित्ताने आले होते. त्यावेळी राहूल हिरामण बिऱ्हाडे उर्फ बाबा रा. गेंदालाल मील जळगाव आणि इतर अनोळखी दोन जण यांनी काहीही कारण नसतांना आकाश वाघ व त्याच्या दोन्ही मित्रांना शिवीगाळ करून फायटरने मारहाण केली. या मारहाणीत तिघेजण जखमी झाले. जखमींवर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी मंगळवारी १६ ऑगस्ट रोजी दुपारी आकाश वाघच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार उल्हास चऱ्हाटे हे करीत आहे.

Protected Content