विरोधकांची केविलवाणी अवस्था : ना. गिरीश महाजन

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विरोधकांच्या जोरदार घोषणाबाजीला उत्तर देतांना ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांनी पलटवार करत उत्तर दिले आहे.

आजपासून राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. याआधी विधीमंडळाच्या पायर्‍यांवर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यात स्थगिती सरकार हाय-हाय, पन्नास खोके-एकदम ओके, आले रे आले गद्दार आले आदींसह अन्य घोषणांनी परिसर दणाणून निघाला. यात मविआच्या आमदारांनी सरकारला लक्ष्य केले.

यावर टिव्ही नाईन या वृत्तवाहिनीशी बोलतांना राज्याचे ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. गिरीश महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, सध्या विरोधकांची अतिशय केविलवाणी अवस्था असल्याने त्यांनी खोके आणि पेटीची भाषा सुरू केली आहे. यातील अनेक नेते मध्ये गेले असून बरेच जण चौकशीच्या फेर्‍यात आहेत. यामुळे ते सत्ताधार्‍यांवर टीका करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तर, महाविकास आघाडी सरकार काहीही करू शकल्याने हा प्रकार सुरू असल्याचा टोला ना. गिरीश महाजन यांनी मारला.

Protected Content