Home क्राईम काल उड्डाणपुलाचे लोकार्पण : आज कोनशीला तोडली : जळगावात विकृतीचा कळस

काल उड्डाणपुलाचे लोकार्पण : आज कोनशीला तोडली : जळगावात विकृतीचा कळस

0
107


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कालच लोकार्पण करण्यात आलेल्या रेल्वे उड्डाण पुलाची कोनशीला आज कुणी तरी विकृत व्यक्तीने तोडल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, पिंप्राळा रेल्वे गेटवर उभारण्यात आलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचे कालच मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले असून हा पूल जनतेला रहदारीसाठी खुला करण्यात आला आहे. काल रात्रीपासूनच यावरून रहदारी सुरू झाली असून आज अनेक जळगावकरांनी या पुलावरून प्रवास करून नाविन्याची अनुभूती घेतली.

दरम्यान, आज सायंकाळीच कुणीतरी माथेफिरूने या पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमाची कोनशीला खालील बाजूने तोडून टाकल्याचे दिसून आले. कार्यक्रम होऊन एक दिवस उलटत नाही तोच अशा प्रकारचे माथेफिरू कृत्य करण्यात आल्याने संताप व्यक्त होत असून यात दोषी आढळलेल्यावर कारवाई करण्याची मागणी आता होत आहे.


Protected Content

Play sound