यावल तालुक्यातील ग्रामसेवक, सरपंच यांनी पुकारलेल्या तीन दिवसीय संपाला मोठा प्रतिसाद

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । यावल ग्राम पंचायत आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी राज्यातील आमदार यांना मिळणाऱ्या विकास निधीप्रमाणे ग्रामपंचायत सदस्यांना देखील भरीव निधी मिळावा यासाठी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पद एकत्र करून शासना पंचायत विकास अधिकारी निर्माण करावी व आदी मागण्यासाठी आज पासून सुरू झालेल्या २८ हजार ग्राम पंचायत राज्यव्यापी संपात ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी तसेच सरपंच परिषद व रोजगार सेवक संघटना तसेच संगणक परिचालक संघटना यांनी शंभर टक्के सहभाग घेतल्यामुळे गावातील गाव गाडा व नागरिकांना समस्याना तोंड द्यावे लागले कुणाला कोट कामासाठी व शाळेच्या व विविध योजनांच्या लाभासाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी आवश्यक लागणारे जन्म मृत्यू प्रमाणपत्र विवाह प्रमाणपत्र व मालमत्तेचे उतारे संगणकीय दाखले व रोजगार हमीवर जाणाऱ्या मजुरांची हजेरी पत्रक मजुरी व योजनांच्या हजेरी सर्व कामकाज ठप्प तसेच सरपंच यांच्या कडील दाखले दारिद्र्यरेषे खालील दाखले वैद्यकीय उपचारासाठी मिळू न शकल्याने व ग्रामपंचायतीस कुलूप व काम बंद असल्यामुळे नागरिकांना खूप मोठी अडचण निर्माण झाली शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही हा संपात सहभाग घेतलेला आहे.

जनतेला व नागरिकांना हेतू पुरस्कृत त्रास देण्याचा अथवा वेठीस आण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही, वारंवार शासनाकडे मागण्या करूनही आश्वासनाने पलीकडे कोणतेही गांभीर्याने घेतलेले नाही व सरपंच गाव गाड्यांचा काम करीत असताना सोबत घेऊन गाव विकासाची कामे करीत असताना कामाचा ताण कमी व्हावा व ग्रामपंचायत अधिनियमात सुधारणा व्हाव्यात. ग्रामसेवक ग्राम विकास अधिकारी पद रद्द करून पंचायत विकास अधिकारी पद निर्माण करावे व शासनाने नेमलेल्या आयोगाच्या शिफारसी मान्य कराव्या तसेच इतर मागण्यांसाठी आम्ही सहभाग संपात सहभाग घेतलेला आहे. १८, १९, २o डिसेंबर २०२३ असा सतत ग्राम पंचायत कार्यालयास बंद ठेवून कामकाज बंद ठेवून शंभर टक्के यशस्वी करावी असे आवाहन ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष मजीत अरमान तडवी यांनी केले आहे.

या संपात यावल तालुक्यातील ४८ ग्रामसेवक ६७ सरपंच ६७ ग्राम रोजगार सेवक व संगणक परिचालक संख्या ५५ असुन ही सर्व मंडळी संघटनेने पुकारलेल्या तिन दिवस संपात सहभागी झाले आहे .

Protected Content