भुसावळ नगरपालिका प्रशासनाविरोधात उबाठा गटाचे लाक्षणिक उपोषण

घरपट्टी रद्द करण्यासह ई-टेंडर निविदा रद्द करण्याची मागणी

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ नगरपालिका प्रशासनाने नवीन करवाढीचे दरपत्रक काढण्यात आले. यात घरपट्टी करामध्ये मोठी वाढ केली आहे. शिवाय ठराविक लोकांना ई-टेंडरींगचे कामे मिळावी अशी निविदा काढण्यात आले आहे. याच्या विरोधात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख दिपक धांडे यांनी गुरूवारी २ नोव्हेंबर रोजी भुसावळ नगरपालिकेसमोर लाक्षिणक उपोषणाला बसले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ नगरपालिका प्रशासनाने २६ ऑक्टोबर रोजी शहरातील कामांबाबत निविदा काढण्यात आली. या निविदामध्ये ठराविक लोकांना संधी मिळावी अशा पध्दतीने जाचक अटी लागू करून काढण्यात आली आहे. शिवाय भुसावळ शहरातील घरपट्टीच्या करमध्ये वाढ करण्यात आले आहे. या अनुषंगाने भुसावळ नगरपालिकेने जाहीर केलेली निविदामधील आरएमसी प्लॉटची जाचक अटी रद्द करावी, व भुसावळ शहरातील नगरपालिकेने मालमत्ताधारकांवर केलेली अन्यायकार करवाढीची आकारणी रद्द करावी, भुसावळातील नागरीकांना पाणी, विद्यूत पुरवठा, स्वच्छता या मुलभूत सुविधा देण्यात याव्यात या मागणीसाठी गुरूवार २ नोव्हेंबरपासून भुसावळ नगरपालिकेसमोर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख दिपक धांडे यांनी लाक्षणिक उपोषणाला सुरूवात केली आहे.

Protected Content