विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत आदिवासी प्रकल्प अधिकारी यांना निवेदन

 

यावल : प्रतिनिधी । येथील एकात्मीक आदीवासी विकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या शाळांच्या विद्यार्थ्यांच्या समस्या व मागण्यासंदर्भात आखिल भारतीय आदीवासी विकास परिषदच्यावतीने जिल्हा प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांना निवेदन देण्यात आले  .

 

या निवेदनात म्हटले आहे की सर्पदंशामुळे शासकीय आदीवासी आश्रमशाळेतील दुसऱ्या इयत्तेतील स्व .सलोनी शिवा पावरा हिच्या कुटुंबास आर्थिक मदत  द्या , शासकीय आदीवासी मुलामुलीचे वस्तीगृह व स्वयम योजनेची डीबीटीची रक्कम द्या ,  बाकी असलेली शिष्यवृतीची रक्कम तात्काळ द्या  , ज्या विद्यार्थी व विद्यार्थीनींचे वस्तीगृहातील प्रवेश त्रुटीमुळे राहीले असेल त्यांच्या प्रवेश अर्जाची पुर्तता करून प्रवेश देण्यात यावेत, डॉ सुरेश पाटील नर्सिंग (चोपडा) येथील शिष्यवृत्ती पोर्टल सुरू करून , ज्योती भिल , मनिषा पावरा , सोनु पावरा , सुनिता पावरा , ज्योती पावरा यांच्यासह सर्व विद्यार्थीनींचे प्रवेश उर्वरीत विद्यालयात देण्यात यावे

 

या समस्या आदीवासी विद्यार्थी व विद्यार्थीनींशी संबधीत असुन  निराकरण न झाल्यास अखिल भारतीय आदीवासी विकास परिषदच्या माध्यमातुन आंदोलन छेडले जाईल असा ईशारा या निवेदनाव्दारे देण्यात आला निवेदनावर संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दारासिंग पावरा, चोपडा ग्रामीण अध्यक्ष नाथसिंग पावरा, युवा चोपडा तालुकाध्यक्ष विनेश पावरा, चोपडा तालुका उपाध्यक्ष सचिन पावरा , शिवा पावरा आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत .

 

Protected Content