शहरात भगवान महावीर जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा

WhatsApp Image 2019 04 17 at 8.11.54 PM

जळगाव (प्रतिनधी ) आज सकाळी ७.३० वाजता ध्वजवंदन श्री. वासुपूज्यजी जैन मंदिरात होवून भव्य शोभायात्रेला ध्वज दाखवून सुरेशदादा जैन,  दलीचंदजी जैन,  अशोकभाऊ जैन,  अजय ललवाणी,  दिलीप गांधी सह मान्यवरांनी सुरूवात केली. या रॅलीची सुरूवात श्री. वासुपूज्यजी जैन मंदिरापासून होवून शोभायात्रा टॉवर चौक, बळीरामपेठ चौक मार्गे सुभाष चौक, भवानी चौक, रथ चौक, तिजोरीगल्ली, सागर भवनमार्गे चित्रा चौक, गुजरात स्वीट मार्ट मार्गे बालगंधर्व नाट्यगृह येथे समारोप करण्यात आला.

 

रॅलीचे आकर्षण म्हणजे सर्वप्रथम बँड पथक त्यामागे भगवान महावीर अहिंसा रथ यावर भगवंताच्या तत्त्वांचा संदेश आकर्षित करत होता. निसर्गासोबत पाणी बचतीचं महत्त्व, बेटी बचाव, गोमाता रक्षा रथाद्वारे संदेश दिला होता.  चोवीस तिर्थंकाराच्या प्रतिमा कारवर सजवण्यात आल्या. लेझीम पथकात चिमुकल्याची तालबद्धता दिसून येत होती. या शोभा यात्रेत सुरेशदादा जैन, दलीचंदजी जैन, अशोकभाऊ जैन, अजयजी ललवाणीसह मुनीश्री अस्तीक के सागरजी, मुनीश्री प्रणीत सागरजी सहभागी झाले होते.  रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. भगवान महावीर प्रतिमा बग्गीत सुशोभित करण्यात आली होती. या शोभायात्रेत महिलांचा मोठा सहभाग होता.यानंतर सकाळी 10 वाजता बालगंधर्व नाट्यगृहात मंगलाचरण,  स्वागतगीत,  ध्वजमहत्ता एवं सामुहिक ध्वजारोहणा नंतर मुनीश्री प्रणीत सागरजी यांनी संबोधनात सांगितले की, बनो नीर बन जाओंगे महावीर, जलप्रमाणे निर्मल बना तुम्ही महावीर बनाल तर मुनीश्री अस्तीक सागर यांनी सांगितले की शांती का महामंत्र हलके हो जावो म्हणजे कुठेही काही चुका, सासू, सून, भाऊ यात वादविवाद होतात तेव्हा एकच सांगा जरा हलके हो जाओ असे संबोधन केले.  या कार्यक्रमाच्या सुरूवातीला देहदान स्वीकृती प्रदाता परिवारातील प्रमुख तेजसजी, राहुलजी व कांतीलालजी यांचा बहुमान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी महावीर स्मरण… मोक्ष मार्ग का वरण! या पुस्तकाचे  विमोचन करण्यात आले.  मंचावर समाजचिंतामणी सुरेशदादा जैन, संघपती दलीचंदजी जैन, अशोकभाऊ जैन, रतनलालजी बाफना, प्रदीप मुथा, मानकचंद जैन, अजय ललवाणी, राजेश जैन, दिलीप गांधी हे मान्यवर उपस्थित होते. भगवान महावीर मेरे मॅनेजमेंट गुरू या विषयाच्या प्रमुख वक्त्या जयश्री डागा यांचा सन्मान सन्मानपत्र देवून रत्नाभाभी जैन व ज्योतीभाभी जैन यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी आपल्या उद्बोधनात त्या म्हणाल्या की,  भगवान महावीर यांच्या सिद्धांतांचा आपल्या जीवनात अवलंब केल्यास सुखमय व शांतपूर्ण जगतांना प्रतिष्ठा व समृद्धी हे जीवनाचे लक्ष्य साध्य करता येते. भगवान महावीरांचे विचार, अहिंसेचे मापदंड, समता व भावशुद्धी यातून सफल जीवन जगता येते असे भगवान महावीरांचे विचार सदैव दिशादर्शक ठरते. अंतिम भागात अजय ललवाणी यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी मधुमेह तपासणी व रक्तदान शिबीर आयोजन करण्यात आले होते. यात मोठ्या प्रमाणात रक्तदान बंधु-भगिनींनी केले. यानंतर ११.३०  ते २.३०  वाजेपर्यंत गौतम प्रसादी लाभार्थी भाग्यशाली जैन परिवार व व्यवस्थापन युवाचार्य ग्रुप तथासभी मंडल यांचे कडून हा कार्यक्रम आर. आर. विद्यालयाच्या प्रांगणात झाला संपन्न झाला.      दुपारी ३ ते ५ या दरम्यान श्री वासुपूज्यजी महिला मंडळतर्फे श्री वासुपूज्यजी जैन मंदीर येथे पंचकल्याणक पूजा ने या महोत्सवाची सांगता झाली

 

Add Comment

Protected Content