भरधाव कारची दुचाकीला धडक; दाम्पत्यासह मुलगी जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत पती-पत्नीसह मुलगी जखमी झाल्याची घटना चोपडा तालुक्यातील देवगाव गावानजीक घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी २ मे रोजी दुपारी ३ वाजता अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, सुधाकर बापू बोरसे (वय-३०) रा. पाचोरा हे पत्नी व मुलीसह ३० एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता चोपडा तालुक्यात नातेवाईकांकडे दुचाकी (एमएच १९ डिएक्स ४४३७ ) ने जात असतांना समोरून भरधाव वेगाने येणारी कार क्रमांक  (एमएच १९ एई ४९५२) ने जोरदार धडक दिली. या अपघातात सुधाकर बोरसे यांच्यासह त्यांची पत्नी व मुलगी रस्त्याच्या बाजूला फेकले गेले. या अपघातात तीघे गंभीर जखमी झाले. त्यांना चोपडा ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. सुधाकर बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून   (एमएच १९ एई ४९५२) क्रमांकाच्या अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक जयदीप राजपूत करीत आहे.

Protected Content