कुपोषित आदीवासी बालकाच्या मृत्युस कारणीभुत अधिकाऱ्यांवर कारवाई करा ; मनसेचे ना . यशोमती ठाकुर यांना निवेदन

 

यावल : प्रतिनिधी । आसाराबारी येथील  कुपोषित आदीवासी बालकाच्या मृत्युस कारणीभुत ठरलेल्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा अशा मागणीचे निवेदन आज स्थानिक  मनसे पदाधिकाऱ्यांनी  ना . यशोमती ठाकुर यांना  दिले

 

सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या वड्री धरणाजवळील  आसराबारी आदीवासी वस्तीवरील कुपोषणाग्रस्त बालकाचा दुदैवी मृत्यु झाल्याची तात्काळ चौकशी करा  त्याच्या मृत्युला कारणीभुत अधिकारी व शासकीय योजनांचा लाभ आदीवासी बांधवांपर्यंत न पहोचवणाऱ्या निष्क्रीय अधिकाऱ्यावर तात्काळ  कारवाई  करावी या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित विभाग जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर यांनी महीला व बालविकास मंत्री ना . यशोमती ठाकुर यांना दिले आहे .

 

आज महिला व बालविकास मंत्री ना .यशोमती ठाकुर आज यावल तालुक्यात विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने आल्या आहेत वढोदा येथे त्या जात असतांना यावल येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाजवळ  कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी त्यांच्यासोबत आमदार शिरीष चौधरी , पंचायत समितीचे गटनेते शेखर पाटील आदी उपस्थित होते

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने रावेर विभाग जनहित जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर यांनी कुपोषणग्रस्त बालकांच्या  तालुक्यातील एकूण परिस्थिती संदर्भात ना . ठाकुर यांच्याशी चर्चा करून ३१ जुलैरोजी कुपोषणामुळे मरण पावलेल्या आठ महीन्यांच्या बालकाविषयी माहीती दिली सातपुडा पर्वताच्या कुशीत असलेल्या आदीवासी पाड्यांवर राज्य शासनाच्या  कोटयावधी रुपयांच्या योजना खऱ्या अर्थाने जात नसल्याने कुपोषणग्रस्तांची संख्याही वाढत असल्याची माहीती यावेळी अढळकर यांनी दिली  वरिष्ठ पातळीवरील शासकीय यत्रंणेच्यावतीने या आदीवासी वस्तीवरील बालकांचे व गरोदर मातांचे  पुन्हा सर्वेक्षण  झाल्यास  अनेक धक्कादायक प्रकार समोर येण्याची  शक्यता आहे तात्काळ योग्य पाऊल  उचलावे  अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मनसे स्टाईाने समाचार घेतला जाईल अशा ईशारा या  निवेदनात देण्यात आला आहे

 

याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे यावल तालुका उपाध्यक्ष शाम पवार , शहर अध्यक्ष किशोार नन्नवरे , विभाग अध्यक्ष आबीद कच्छी , आकाश फेगडे,  विपुल येवले, प्रतिक येवले, विनोद शिंपी आदी कार्यकर्ते  उपस्थित होते .

 

Protected Content