पँनकार्ड क्लबच्या गुंतवणूकदारांना लवकर परतवा द्या : तालुका कॉंग्रेसचे यशोमती ठाकूर यांना निवेदन

फैजपूर, प्रतिनिधी । जळगाव तालुका ग्रामीण काँग्रेसतर्फे महीला व  बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांना पँनकार्ड क्लब या कंपनीत गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना लवकरात लवकर परतावा मिळावा यासाठी निवेदन देण्यात आले. 

महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना निवेदन देतांना  जळगाव तालुका ग्रामीण काँग्रेस तालुका अध्यक्ष मनोज चौधरी , प्रमोद घुगे, रेखा कपले, नितीन पाटील, लीना पाटील, माधुरी पाटील, प्रशांत वाघुळदे, किरण चौधरी, भाऊसाहेब सोनवणे, रविंद्र पाटील, संजय पाटील , प्रविण पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मैत्रेय कंपनीबाबत आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केलेला पाठपुरावा व महाराष्ट्र शासनाने दिलेल्या निकालाबद्दल माहीती मंत्री महोदयांना  करुन देण्यात आली.

 

Protected Content