त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांच्या हत्येचा प्रयत्नात तिघांना अटक

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । त्रिपुरामध्ये कारने मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांच्या सुरक्षा दलाला धडक दिली. नंतर ती गाडी पायी चालणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या जवळून गेली. मुख्यमंत्री बचावले, पण सुरक्षा कर्मचारी जखमी झाले  पोलिसांनी तिघांना अटक केली. मुख्यमंत्र्यांच्या हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मुख्यमंत्री सुरक्षेसह श्यामा प्रसाद मुखर्जी लेनवर संध्याकाळी फिरायला गेले होते. हे ठिकाण त्याच्या निवासस्थानाजवळ आहे. एक कार तिथल्या सुरक्षा वर्तुळात शिरली. ती गाडी मुख्यमंत्र्यांच्या दिशेने येत होती, पण मुख्यमंत्र्यानी उडी मारली आणि बाजूला झाले. यामुळे त्यांना इजा झाली नाही, परंतु एका सुरक्षा कर्मचाऱ्याला किरकोळ दुखापत झाली.

 

पोलीस अधिकारी म्हणाले की ही घटना कोविड नाईट कर्फ्यू दरम्यान घडली आणि तीन तरुणांनी केवळ कर्फ्यू नियमांचे उल्लंघन केले नाही तर बेकायदेशीरपणे सहा पोलीस बॅरिकेड्स देखील ओलांडले. या तीन मद्यधुंद तरुणांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी एका पोलिसावर हल्ला केला.

 

Protected Content