भुवनेश्‍वर कुमार पुन्हा जखमी ; भारतीय संघाला धक्का

virat rohit

नवी दिल्ली वृत्तसंस्था । भारतीय संघाचे पुढील लक्ष्य वनडे मालिकेवर आहे. येत्या १५ डिसेंबर दोन्ही संघादरम्यानची वनडे मालिका सुरु होत आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेआधीच भारतीय गोलंदाजीची धार कमी झाली आहे. भारताचा मुख्य गोलंदाज भुवनेश्वर कुमार पुन्हा एकदा जखमी झाला असून संघाला मोठा धक्का बसला आहे.

पहिला सामना खेळण्यासाठी भारतीय संघ चेन्नईत दाखल झाला आहे. त्यामुळे आगामी मालिकेत भुवनेश्वर खेळणार की नाही याबद्दल शंका निर्माण झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भुवनेश्वरच्या जागी नवदीप सैनीला संधी मिळण्याची शक्यता आहे. सैनी देखील काही दिवसांपूर्वी जखमी झाला होता. दिल्लीकडून काही दिवसांपूर्वी रजणी सामन्यातून त्याने कमबॅक केले होते. भुवनेश्वरच्या दुखापती संदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही. याआधी ऑगस्ट महिन्यात देखील भुवनेश्वरला दुखापत झाली होती. त्यानंतर मोठ्या कालावधीसाठी तो संघाबाहेर होता. वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी-२० मालिकेत तो मैदानात उतरला होता. हैदराबादमध्ये झालेल्या टी-२० सामन्याआधी त्याने १४ ऑगस्ट रोजी सामना खेळला होता.

Protected Content