फैजपूर येथे अवैधरित्या गौणखनिज वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई

फैजपूर प्रतिनिधी । रावेर रस्त्यावर अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई करत दोन्ही वाहने जप्त करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, फैजपूर-रावेर रस्त्यावर अवैधरित्या गौणखनिजाची वाहतूक करत असल्याची माहिती फैजपूर प्रांताधिकारी यांना माहिती मिळाल्यानंतर पथकाने आज सकाळी 8 वाजता कारवाई करत संजय बोंदरू सपकाळे यांच्या मालकीचे ट्रक्टर क्रमांक एमएच 19 सीवाय 4648 मध्ये तीन ब्रास मुरूमाची वाहतूक करतांना आढळून आले. तसेच सकाळी 10 वाजता तालुक्यातील अंजाळे येथील सुभाष महारू सपकाळे यांच्या मालकीचे ट्रक्टर क्रमांक एमएच 19 झेड 5294 मध्ये तीन ब्रास माती आढळून आली. याप्रकरणी दोन्ही वाहने फैजपूर प्रांताधिकारीच्या पथकाने कारवाई करत फैजपूर पोलीस स्थानकात जमा करण्यात आले आहे.

Protected Content