फैजपूर शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सलीम पिंजारी

फैजपूर प्रतिनिधी । मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व मराठी पत्रकार दिनानिमित्त फैजपूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात नुकतीच घेण्यात आलेल्या बैठकीत फैजपुर शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सलीम पिंजारी यांची सालाबादाप्रमाणे बिनविरोध निवड करण्यात आली.

येथील मावळते शहराध्यक्ष प्राध्यापक उमाकांत पाटील यांनी सलीम पिंजारी यांची निवड झाल्याचे जाहीर केले उर्वरित कार्यकारणी उपाध्यक्ष मयूर मेढे कार्याध्यक्ष वासुदेव सरोदे  योगेश सोनवणे सचिव संजय सराफ तसेच ज्येष्ठ पत्रकार अरुण होले, खजिनदार तसेच प्राध्यापक राजेंद्र तायडे, शाकीर मलिक ईदु पिंजारी, जावेद काझी, कामिल शेख, राजू तडवी, निलेश पाटील पुढील प्रमाणे कार्यकारिणी सदस्य आहे. यावेळी प्राध्यापक उमाकांत पाटील यांनी आद्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त मनोगत व्यक्त केले. तसेच संजय सराफ यांनीसुद्धा यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच नवनिर्वाचित सरकार मान्य वार्ता पत्रकार फाउंडेशन संलग्न शाखा फैजपुर शहर पत्रकार संघ अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सलीम पिंजारी यांचे सर्व पत्रकार बांधवांनी स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

 

Protected Content