राज्याची तिसऱ्या लाटेकडे वाटचालीचा आरोग्यमंत्री टोपे यांनी दिला इशारा

जालना, वृत्तसेवा | राज्याने काल ३६ हजार कोरोना रुग्णांचा टप्पा ओलांडला आहे. आपण आता हळू हळू तिसऱ्या लाटेकडे वाटचाल करत असल्याचा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.

 

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यात कठोर निर्बंध लागू करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आता लागू केलेल्या निर्बंधाचे पालन करणं गरजेचं असून जे निर्बंध पाळणार नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला हवे, असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच निर्बंध कडक करावे लागतील, असा इशारा देखील श्री. टोपे यांनी दिला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना मास्क नसेल तर दंड करा, गर्दी टाळा असे आदेश दिले जातील. कोरोना रुग्णांची संख्या वाढली तरी घाबरून जाण्याची गरज नाही. भविष्यात रुग्णसंख्या वाढली तर निर्बंधाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असा इशारा टोपे यांनी दिला आहे.

 

Protected Content