नवी दिल्ली, वृत्तसंस्था । दिल्लीतून सुरक्षा पथकांनी शुक्रवारी रात्री अबू युसूफला अटक केली. हा दहशतवादी युसूफ-अल-हिंदी ऊर्फ साफी अरमारच्या संपर्कात होता. युसूफ-अल-हिंदी हा इंडियन मुजाहिद्दीनचा फरार दहशतवादी आहे. युसूफ-अल-हिंदी अफगाणिस्तानातून पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या मदतीने इस्लामिक स्टेटचे खोरासन मॉड्युल चालवतो.
भारतात इंडियन मुजाहिद्दीनचे सर्व नेटवर्क उघड झाल्यानंतर युसूफ-अल-हिंदीने आयएमच्या फरार दहशतवाद्यांच्या मदतीने इस्लामिक स्टेटचे खोरासन मॉड्युल उभे केले. त्याला यासाठी पाकिस्तानच्या ISI चे पाठबळ मिळाले. ISI ने IS खोरासनवर दिल्लीला हादरवण्याची जबाबदारी सोपवली होती. .
युसूफ-अल-हिंदीने या कामासाठी अबू युसूफची निवड केली होती. टेलिग्राम, वीचॅट या मोबाइल चॅट अॅपच्या माध्यमातून अबू भारतात असलेल्या अन्य दहशतवाद्यांच्या संपर्कात होता. युसूफ-अल-हिंदी अफगाणिस्तानात राहून भारतीय नागरिकांना दहशतवादासाठी तयार करतो. भारतीय इंटेलिजन्स एजन्सी ‘रॉ’ च्या ही तो रडारवर आहे. अटक केली त्यावेळी त्याच्याकडे १५ किलो IED स्फोटके सापडली.