वर्दीतली माणुसकी दिसली पण, आधार देणारे झोपेतच

 

रावेर, प्रतिनिधी । खिरवड येथील ७० वर्षीय निराधार आजीला संजय गांधी निराधार योजनेचे पेंशन घेण्यासाठी थेट खिरवड येथून पायीपीट करावी लागत आहे याचे वृत्त लाईव्ह ट्रेंड्स न्यूजने प्रसिध्द करताच वर्दीतली माणुसकी दिसली पण,हे पेन्शन देणारे महसूल खाते झोपेतच आहे. पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे खिरवड येथे या आजीच्या घरी जाऊन फळे व आर्थिक मदत केली.

लाईव्ह ट्रेंडस न्यूजला’ या आजीची परवड सांगणारी बातमी प्रसिध्द होताच खिडवड येथील ७० वर्षीय जयवंताआजीसाठी मदतीचे हात सरसावले आहे. घरी जाऊन पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे यांनी आजी’ला फळ व आर्थिक मदत केली श्री वाकोडे यांच्या मदत घेतांना आजी’ला अश्रु अनावर झाले आजी म्हणाली पोटात एक कण सुध्दा नसतांना केलेली मदत खुप महत्वाची आहे. घरी जाऊन पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे यांनी केलेली मदत व तब्येतीची विचारपूस पाहून गावातील लोकांनी सुध्दा आजीला मदत करणार असल्याचे सांगितले रावेरातील व्यापारी विशाल अग्रवाल देखिल आजीला एक महिन्यांचा किराणा देणार आहे.

जयवंताआजी यापुर्वी तीन-चार वेळा रावेरात संजय गांधी निराधार योजनेच्या पेंशनसाठी आली. परंतु निद्रावस्थेत असलेले महसूल अधिकाऱ्यांना आजीची पायीपीट व वय पाहून जराही माणुसकीचा पाझर फुटला नाही त्यांच्या बद्दल आजीने प्रचंड नाराजी व्यक्त केली या आजीला दोन महिन्यांपासुन पेंशन मिळाले नसल्याने आजी गावात दुसऱ्यांनी दिलेल्या अन्नावर कसे तरी आपले पोट भरत आहे. तालुक्यातील इतर वृध्द पुरुष व महिला आपल्या पेंशनच्या चौकशीसाठी रावेरात चकरा मारतात परंतु त्यांना येथून निराशे व्यतिरिक्त काहीच मिळत नाही.

Protected Content