अक्कलकोट येथील स्वामीची पालखी पादुका ६ मे रोजी जळगावात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी दिनी सोमवार ६ मे रोजी शहरात श्री क्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या पालखी-पादुकांचे शुभागमन होणार आहे. भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

श्री क्षेत्र अक्कलकोट येथील अन्नछत्र मंडळाच्यावतीने बांधण्यात येत असलेल्या भक्त निवास व प्रसादलयासाठी आर्थिक योगदान मिळावे. तसेच परगावच्या भक्तांना महाराजांच्या दर्शनाचा लाभ व्हावा. या उद्देशातून अन्नछत्र मंडळाच्यावतीने पालखी परिक्रमेचे आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक व गोव्यातून ही पालखी परिक्रमा करते. गेल्या १८ वर्षांपासून शहरात श्री स्वामींच्या पालखीचे आगमन होत आहे. सोमवारी ६ मे रोजी सकाळी ११ वाजता श्री स्वामींच्या पुण्यतिथी दिनी जळगाव शहरात पालखी-पादुका येण्याचा योग येत आहे. सकाळी ११ वाजेला पांडे डेअरी चौकात पालखीचे शुभआगमन होऊन तेथून शोभायात्रेने पालखी गणेशवाडी येथे भीमराव शिरसाळे यांच्या निवासस्थानी येईल. तेथे पूजा -अभिषेक झाल्यानंतर दर्शन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजेला पालखीचे प्रस्थान होईल. भाविकांनी दर्शन व प्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन शिरसाळे परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.

Protected Content